UPSC Exam | यूपीएससीची परीक्षा 4 ऑक्टोबरलाच होणार, पूर्व परीक्षा पुढे ढकलण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार
देशभरात बुधवारी 4 ऑक्टोबरला होणारी यूपीएससी (UPSC) नागरी सेवा प्राथमिक परीक्षा पुढे ढकलण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. देशात बर्याच भागांमध्ये कोविड19 साथीचा आजार आणि पूर आल्यामुळे परिस्थिती वाईट आहे. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी यासाठी याचिका दाखल करण्यात आली होती.