Hathras Stampede : योगी आदित्यनाथ यांनी हाथरसमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत घटनास्थळाची पाहणी
UP Hathras Stampede Tragedy: उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) हाथरस (Hathras Tragedy) येथे सत्संगच्या कार्यक्रमादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांचा आकडा आता 121 वर पोहोचला आहे. आतापर्यंत मृत्यू झालेल्यांमध्ये महिला आणि लहान मुलांचाही समावेश आहे. हाथरस येथील रतिभानपूर गावात ही घटना घडली. हाथरसमधील एका गावात साकार विश्व हरी भोले बाबा यांचं सत्संग आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला हजारो अनुयायी उपस्थित होते. सत्संगदरम्यान या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती. त्याचवेळी चेंगराचेंगरी झाली, जमलेले लोक एकमेकांना तुडवत होते. या घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढणार आहे.
उत्तर प्रदेशच्या हाथरसमध्ये काल झालेल्या चेंगराचेंगरीत मृतांचा आकडा १२१वर पोहोचला आहे, यामध्ये ११२ महिला आणि ७ लहान मुलांचा समावेश आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. दरम्यान, भोलेबाबाच्या ज्या सहकाऱ्यानं हा सस्तंग आयोजित केला होता, त्या देवप्रकाश मधुकरवर आज अनेक गुन्हे दाखल केले. मात्र भोलेबाबा उर्फ सूरजपाल सिंहवर कुठलाही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. सत्संग संपल्यावर भोलेबाबा आपल्या कारकडे जात असताना त्यांची चरणधूळ जमा करण्यासाठी अनेक भाविक धावले, आणि नेमकं हेच कृत्य चेंगराचेंगरीचं कारण ठरलं असं तपासात समोर आलं आहे.