UP : लखनौच्या काकोरीमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राम मंदिर?
लखनौच्या काकोरीमधून अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्यांच्या निशाण्यावर अयोध्येतील राम मंदिर असल्याची माहिती तपासातून समोर येतेय. या दहशतवाद्यांकडून राममंदिर परिसराचे नकाशे सापडलेत. या दहशतवाद्यांनी मंदिराच्या आसपासच्या परिसरात रेकी केल्याचंही उघड झालंय. याशिवाय काशी, मथुरा या धार्मिक शहरांचे नकाशेही दहशतवाद्यांकडून जप्त करण्यात आलेत. दहशतवाद्यांचे टेलिग्राम आणि व्हीडिओ कॉल तसंच व्हॉट्सअॅप चॅटिंगही एटीएसच्या हाती लागलंय. या आधारे एटीएसने आता तपास सुरु केलाय. गेल्या २४ तासांत एटीएसने १०पेक्षा अधिक संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुुरु केलीय.