Unclaimed Money Bank : दहा वर्षात तब्बल 35 हजार कोटी रुपये बॅंकांमध्ये पडूनच

Continues below advertisement

अनेकजण आपले पैसे सुरक्षित राहावे म्हणून ते बॅंकेत ठेवत असतो. पण अनेकदा स्वत:चा घाम गाळून कमावलेले पैसे काहीजण विसरुन जातात किंवा काही कारणास्तव ते पैसे बँकेत पडून राहतात. अशाच बॅंकेत पडून राहिलेल्या पैशांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. मागच्या 10 वर्षांचा कालावधी उलटूनही ग्राहकांनी त्यांचे पैसे बॅंकेतून परत घेतलेले नाहीत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांकडे असणाऱ्या या पैशांचे मूल्य 35 हजार कोटी रुपयांच्या घरात आहे. केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी ही माहिती दिली आहे. महत्त्वाचं म्हणजे, बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये असे ८३८ कोटी पडून असल्याचीही माहिती कराड यांनी दिलीय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram