Uday Samant on Gujrat Tour :मंत्री उदय सामंत आणि सुधीर मुनगंटीवार गुजरात दौऱ्यावर,थोड्याच वेळात बैठक

फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर टीकेचे धनी झालेल्या शिंदे सरकारमधील उद्योगमंत्री उदय सामंत आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आज गुजरातच्या अभ्यास दौऱ्यावर आहेत. राजधानी गांधीनगरमध्ये आज त्यांची गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक आहे. गुजरातच्या औद्योगिक सेन्ट्रलाईज्ड सिस्टीमचा अभ्यास या दौऱ्यात केला जाणार आहे. या दोन मंत्र्यांसोबत मुख्यमंत्री कार्यालयातील सचिव आणि इतर अधिकारीही गुजरात दौऱ्यावर आहेत. फॉक्सकॉन वेदांता प्रकल्प गुजरातला गेल्यानंतर गुजरातमधील उद्योगांसाठी असलेल्या सोई सुविधांचा या दौर्यात आढावा घेतला जाणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola