Jammu Blast : जम्मूच्या टेक्निकल विमानतळ परिसरात स्फोट
जम्मू : जम्मूच्या टेक्निकल विमानतळ परिसरात स्फोट झाल्याची माहिती मिळते आहे. काल रात्री दोन वाजताच्या सुमारास दोन स्फोट झाले. जम्मू पोलिसांनी याची पुष्टी केली आहे. या स्फोटांत दोन जण जखमी झाले असून, त्यांना सैन्याच्या रुग्णालयात नेण्यात आले आहे. जम्मू पोलिसांच्या म्हणण्यानुसार हा कमी तीव्रतेचा स्फोट होता. खबरदारी म्हणून बॉम्ब डिस्पोजल टीम आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार या स्फोटाचा आवाज खूप दूर ऐकायला गेला.
या ठिकाणी भारतीय हवाई दलाचे स्टेशन मुख्यालय तसेच जम्मूचे मुख्य विमानतळही याच परिसरात येतं. स्फोटानंतर आजूबाजूच्या परिसरात गोंधळाचं वातावरण पसरलं आहे. घटनास्थळी हवाई दल, भारतीय सेना आणि जम्मू-काश्मीर पोलिसांचे अधिकारी दाखल झाले आहेत.
पोलीस आणि भारतीय सेना वेगवेगळ्या शक्यतांचा तपास करत आहेत. या स्फोटामागे दहशतवाद्याचा हात असल्याचं बोललं जात आहे. परंतू अद्याप पोलिसांनी कोणत्याच गोष्टीला दुजोरा दिलेला नाही. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, आम्ही या प्रकरणाचा वेगाने तपास करीत आहोत आणि लवकरच सत्य समोर येईल.