The Manipur Files: कसं पेटलं मणिपूर... कशी झाली शांततेची राख ?

Continues below advertisement

The Manipur Files: कसं पेटलं मणिपूर... कशी झाली शांततेची राख ? द मणिपूर फाईल्स... ही धगधगती फाईल लिहायला सुरूवात झाली त्याला आता शंभर दिवस उलटून गेलेत... त्यातलं एकेक पान धडकी भरायला लावणारं आणि प्रचंड रक्तरंजित आहे... मणिपूर... एक घटना घडते आणि हिंसाचाराचा वणवा वाऱ्याच्या वेगाने पसरत गेला... आणि सोबत जाळत गेला... माणसं, घरं, शाळा आणि जे वाटेत येईल ते... मणिपूर खरंच असं होतं का?, हिरव्या गर्द निसर्गाच्या या राज्यात रक्ताचे पाट का वाहू लागलेत? या सगळ्याला केंद्र आणि राज्य सरकारची फूस आहे का? या आणि अशा भेदक प्रश्नांचा पाठलाग केलाय, आमचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांनी... आणि मूळ महाराष्ट्राचे असलेले आणि तब्बल चार दशकं मणिपुरात राहणाऱ्या एका मराठमोळ्या अधिकाऱ्याने गर्भित इशारे आणि खळबळजनक अंदाज व्यक्त केलेत... पाहूया... द मणिपूर फाईल्सचं आणखी एक धगधगतं पान...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram