One Day Cricket : टीम इंडियाची थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद 390ची मोठी मजल

कोहलीची धडाकेबाज दीडशतकी खेळी आणि शुबमन गिलचं आक्रमक शतक याच्या बळावर टीम इंडियाने थिरुवनंतपुरमच्या तिसऱ्या वनडेत श्रीलंकेविरुद्ध पाच बाद ३९० ची मोठी मजल मारली. कोहलीने ११० चेंडूंत १३ चौकार आणि ८ षटकारांच्या साथीने नाबाद १६६ धावांची धडाकेबाज खेळी केली. तर, गिलने ९७ चेंडूंत ११६ धावांचं दमदार अर्धशतक ठोकलं. या खेळीत १४ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता. रोहित शर्माने ४२ तर श्रेयस अय्यरने ३८ धावांचं योगदान दिलं. या सामन्यात कोहलीने झळकावलेलं हे ४६ वं वनडे शतक ठरलं. आता सचिनच्या ४९ वनडे शतकांच्या विक्रमापासून तो अवघा तीन शतक दूर आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola