India vs Sri Lanka Match: मोहाली कसोटीवर टीम इंडीयाचं वर्चस्व ABP Majha

मोहाली कसोटीत पहिल्या डावात भारताने धावांचा डोंगर उभारलाय. भारताने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केलाय. रवींद्र जाडेजाने १७५ धावांची नाबाद खेळी केलीय. त्याच्या या खेळीत १७ चौकार आणि ३ उत्तुंग षटकारांचा समावेश होता. जाडेजाचे हे कसोटी कारकिर्दीतलं दुसरे शतक आहे. या कसोटीत जाडेजाने कपिल देव यांच्या विक्रमाशी बरोबरी केलीय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाच हजारांहून अधिक धावा आणि चारशेहून अधिक गडी बाद करणारा जाडेजा हा कपिल यांच्यानंतर दुसरा भारतीय ठरलाय. याशिवाय पंतच्या ९६ धावा, अश्विन आणि विहारीच्या अर्धशतकी खेळीमुळे भारताने पहिला डाव ५७४ धावांवर घोषित केलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola