Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी पुन्हा एकदा टाटाकडे; 68 वर्षांनी सांभाळणार जबाबदारी, अधिकृत घोषणा नाही

Continues below advertisement

Tata Acquired Air India : एअर इंडियाची मालकी तब्बल 67 वर्षांनी पुन्हा एकदा टाटा सन्सकडे जाणार आहे. ब्लुमर्गच्या वृत्तानुसार, टाटा सन्सकडून एअर इंडियासाठी लावण्यात आलेली बोली मंत्री गटानं मान्य केलीय. दरम्यान अद्याप टाटा सन्स किंवा एअर इंडियाकडून कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.

 

सरकारी एअरलाईन्स कंपनी एअर इंडिया  (Air India) टाटा खरेदी करणार आहेत. ब्लूमबर्ग (Bloomberg) वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, Air India साठी पॅनलनं टाटा ग्रुपची निवड केली आहे. एअर इंडियासाठी टाटा ग्रुप (Tata Group) आणि स्पाइसजेट (SpiceJet)च्या अजय सिंह यांनी बोली लावली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सरकार लवकरच अधिकृतपणे याची घोषणा करु शकते. दरम्यान, जेआरडी टाटा यांनी 1932 मध्ये टाटा एअरलाइन्सची स्थापना केली होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी विमान सेवा रोखण्यात आल्या होत्या. त्यानंतर विमान सेवा बहाल झाल्यानंतर 29 जुलै 1946 टाटा एअरलाइन्सचं नाव बदलून त्याचं नाव एअर इंडिया लिमिटेड करण्यात आलं होतं. स्वातंत्र्यानंतर 1947 मध्ये एअर इंडियातील 49 टक्के भागीदारी सरकारनं घेतली होती. 1953 मध्ये याचं राष्ट्रीयकरण करण्यात आलं होतं. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram