T20 World cup : भारताकडून अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव

Continues below advertisement

T20 World cup  : भारताकडून अफगाणिस्तानचा 47 धावांनी पराभव

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील दुसऱ्यात किंग विराट कोहलीनं (Virat Kohli) T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तब्बल 429 दिवसांनी पुनरागमन केले. 2022 च्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये विराट या फॉरमॅटमध्ये शेवटचा दिसला होता. प्रदीर्घ कालावधीनंतर टी-20 मध्ये पुनरागमन केल्यामुळे विराट कोहलीवर सर्वांची नजर होती. विजयासाठी 173 धावांचे आव्हान घेऊन उतरलेल्या टीम इंडियाची सुरुवात निराशाजनक झाली.कॅप्टन रोहित पहिल्याच चेंडूवर शुन्यावर बाद झाला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर किंग कोहली मैदानात आला. त्याने दुसऱ्याच चेंडूवर क्लासिक ड्राईव्ह करत इरादा स्पष्ट केला. कोहली 16 चेंडूत 5 चौकारांसह 29 धावा करून  बाद झाला. त्याला नावीनने बाद केले. त्याचा एक चौकार वर्ल्डकपमधील पाकिस्तानच्या हॅरिस रौफला मारलेल्या सिक्सची आठवण करून देणारा होता. किंचित अंतराने तो चौकार ठरला. कोहली टी-20 क्रिकेटमध्ये 12000 धावा पूर्ण करण्याच्या अगदी जवळ आहे. या आकड्यापासून तो फक्त 35 धावा दूर होता. मात्र, 29 धावांवर बाद झाल्याने आता तिसऱ्या सामन्याची वाट पाहावी लागणार आहे. या आकड्याला स्पर्श करणारा तो चौथा क्रिकेटपटू ठरेल. कोहलीने आतापर्यंत T20 क्रिकेटमध्ये (इंटरनॅशनल + डोमेस्टिक टी20 + फ्रँचायझी लीग) 11,994 धावा केल्या आहेत. या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. या यादीत त्याच्या पुढे असलेल्या तीन फलंदाजांनी 12 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. पहिल्या क्रमांकावर ख्रिस गेल आहे, ज्याने टी-20 क्रिकेटमध्ये 14,562 धावा केल्या आहेत. दुसरे स्थान शोएब मलिकचे आहे. या पाकिस्तानी फलंदाजाने T20 क्रिकेटमध्ये 12,993 धावा केल्या आहेत. किरॉन पोलार्ड तिसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डने आतापर्यंत 12,430 धावा केल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram