T 20 World Cup India vs Bangladesh : टी 20 विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये भारत - बांग्लादेश सामना
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppT 20 World Cup India vs Bangladesh : टी 20 विश्वचषकाच्या सुपर एटमध्ये भारत - बांग्लादेश सामना
हेही वाचा :
टी-20 विश्वचषक 2024 मधील सुपर 8 मधील चौथा सामना ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश यांच्यात खेळवण्यात येत आहे. हा सामना एंटीगुआमधील सर विवियन रिचर्ड्स मैदानावर सुरु आहे. बांगलादेशने डावाची सुरुवात चांगली केली होती. मात्र धावा चेंडूच्या तुलनेने कमी सुरु होत्या. बांगलादेशने जेव्हा धावांची गती वाढवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी कमाल दाखवत झटपट विकेट्स पटकावल्या. याचदरम्यान ऑस्ट्रेलिया संघाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने (Pat Cummins) यंदाच्या टी-20 विश्वचषकात एक भीमपराक्रम आपल्या नावावर केला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स 2024 मधील टी-20 विश्वचषकात हॅट्रिक घेणारा पहिला खेळाडू ठरला आहे. बांगलादेशविरुद्धच्या सुपर-8 मधील सामन्यात पॅट कमिन्सने ही कामगिरी केली. पॅट कमिन्सने महमुदुल्लाह रियाद, मेहदी हसन आणि तौहीद हिरदॉयला बाद केले.