T 20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा नवा मानकरी कोण ? भारत की दक्षिण आफ्रिका ?

Continues below advertisement

T 20 World Cup : टी 20 विश्वचषकाचा नवा मानकरी कोण ? भारत की दक्षिण आफ्रिका ?  नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल.  टी-20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. टी-20 विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी-20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे.  भारताने 2007 पाकिस्तानला पराभूत साली टी-20 विश्वचषक जिंकला होता. तर 2014 साली अंतिम सामन्यात भारतीय संघ दाखल झाला होता. यावेळी बांगलादेशकडून पराभवाचा सामना करावा लागला. यंदा रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताला इतिहास रचण्याची संधी आहे. याचदरम्यान ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने रोहित शर्माला एक सल्ला दिला आहे. टीम इंडिया संपूर्ण विश्वचषकात अपराजित आहे, त्यामुळे त्यांना काहीही बदल करण्याची गरज नाही. टीम इंडियाच्या प्रत्येक खेळाडूला उत्तम प्रदर्शन करावं लागणार आहे. जर प्रत्येक खेळाडूने आपली जबाबदारी योग्य रीतीने पार पाडली, तर टीम इंडियाला पराभूत करणं अवघड जाणार असल्याचं रिकी पाँटिंग म्हणाला.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram