Adani Hindenburg प्रकरणी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, SEBI ला तीन महिन्यांची मुदत, SIT ची गरज नाही!

हिडेंनबर्ग प्रकरणात सेबी करत असलेला तपास काढून एसआयटी चौकशीची गरज नाही असं म्हणत सुप्रीम कोर्टाने अदानी समुहाला मोठा दिलासा दिलाय. आंतरराष्ट्रीय अहवालावर चौकशीचे आदेश दिले जाऊ शकत नाहीत असं कोर्टाने म्हटलंय. कोणत्याही थर्ड पार्टी एजन्सीचा अहवाल पडताळणीशिवाय पुरावा ठरू शकत नाही असं कोर्टाने म्हटलंय. शेअर बाजाराशी संबंधित नियमावली तयार करणं हे सेबीचं काम आहे असं कोर्टाने म्हटलंय. सेबीने दोन महिन्यात चौकशी करत अहवाल द्यावा असे आदेश कोर्टाने दिले. शॉर्टसेलिंग मधून नफेखोरी झाली असल्यास कायद्यानुसार कारवाई करा असं कोर्टाने म्हटलंय. एकूण २२ पैकी २० प्रकरणांवर सेबीने तपास केला आहे , त्यामुळे उर्वरित तपासासाठी तीन महिन्यांचा सेबीला अतिरिक्त वेळ देण्यात आलाय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola