Nirbhaya convict | फाशी टाळण्यासाठी निर्भया प्रकरणातील दोषीची सुप्रीम कोर्टात धाव | ABP Majha
Continues below advertisement
दिल्लीतील निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताच्या याचिकेवर (स्पेशल लीव्ह पिटीशन) आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. गुन्हा केला त्यावेळी आपलं वय 18 वर्षांपेक्षा कमी होतं आणि अल्पवयीन होतो, असा दावा पवन गुप्ताने याचिकेत केला आहे. न्यायमूर्ती आर भानुमती, न्यायमूर्ती अशोक भूषण आणि न्यायमूर्ती ए एन बोपण्णा यांचं खंडपीठ पवन गुप्ताच्या याचिकेवर सुनावणी करेल. याआधी दिल्ली उच्च न्यायालयानेही पवनचा अल्पवयीन असल्याचा दावा फेटाळला होता. तसंच वकिलांना 25 हजार रुपयांचा दंडही ठोठावला होता.
Continues below advertisement