Supreme Court Reject Electoral Bonds : इलेक्टोरल बाँड्स घटनात्मक दृष्ट्या अवैध; सर्वोच्च न्यायालयाचा धक्का
Continues below advertisement
Supreme Court Reject Electoral Bonds Scheme : निवडणुक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स - Electoral Bonds ) योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील काळा पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्टोरल बाँड्स हा एकमेव मार्ग नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.त्याशिवाय, आता निवडणूक रोखे तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjaya Chandrachud) यांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे.
Continues below advertisement