Supreme Court : Electoral Bonds Scheme संदर्भातल्या निकालावर वकील सिद्धार्थ शिंदे म्हणतात...
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSupreme Court Reject Electoral Bonds Scheme : निवडणुक रोख्यांची (इलेक्टोरल बाँड्स - Electoral Bonds ) योजना ही घटनात्मकदृष्ट्या अवैध असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) दिला आहे. सुप्रीम कोर्टाचा हा निर्वाळा पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारला मोठा धक्का असल्याचे म्हटले आहे. निवडणुकीतील काळा पैशांचा वापर रोखण्यासाठी इलेक्टोरल बाँड्स हा एकमेव मार्ग नसल्याचे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.त्याशिवाय, आता निवडणूक रोखे तात्काळ प्रभावाने बंद करण्याचे निर्देशही सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड (CJI Dhananjaya Chandrachud) यांच्या घटनापीठाने हा निकाल दिला आहे. दरम्यान इलेक्ट्रोल बॉन्डसंदर्भातला कोर्टाचा निर्णय सविस्तरपण सांगताय आमचे सुप्रीम कोर्टातले वकील सिद्धार्थ शिंदे... त्यांच्याशी बातचित केलीए आमचे प्रतिनिधी सोमेश कोलगे यांनी