मराठा आरक्षणाच्या 50% मर्यादेवर उत्तरासाठी पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, छत्तीसगडने वेळ मागितला
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होतेय. सकाळी पाच न्यायमूर्तींच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीत कोर्टानं इतर राज्यांना नोटीस दिली होती. 102 व्या घटना दुरुस्तीनंतर राज्यांना आरक्षणाचे अधिकार आहेत की नाही हे जाणून घेण्यासाठी या राज्यांना नोटिसा देण्यात आल्यात. आजच्या सुनावणीआधी पंजाब, हरियाणा, तमिळनाडू, छत्तीसगड या चार राज्यांनी उत्तरासाठी चार आठवड्यांचा वेळ मागितला आहे.
Tags :
Maratha Reservation Supreme Court SEBC Act Maratha Reservation LIVE Maratha Reservation In Maharashtra State Government New Delhi Maratha Aarakshan Maratha Reservation Hearing