Hyderabad : हैदराबाद बलात्कारप्रकरणाच्या आरोपींच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर ठपका!

Continues below advertisement

हैदराबाद बलात्कार-हत्या प्रकरणातील आरोपींच्या एन्काऊंटरप्रकरणी पोलिसांवर ठपका ठेवण्यात आलाय. चार आरोपींना ठार मारण्याच्या हेतूनेच पोलिसांनी गोळीबार केल्याचं सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या चौकशी आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आलंय. या दहा पोलिसांवर खटला चालवण्याची शिफारसही आयोगाने केलीय. २०१९मध्ये पशूवैद्यक महिलेवर सामूहिक बलात्कार करुन जाळण्यात आलं होतं.. पोलिसांनी या प्रकरणी चार नराधमांना अटक करण्यात आली. मात्र या चौघांना पोलीस गुन्हा घडलेल्या ठिकाणी घेऊन गेले. तिथे आरोपी आणि पोलिसांमध्ये चकमक झाली. यात चारही आरोपींचा मृत्यू झाला. या चकमकीची चौकशी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आदेशानुसार व्ही.एस. सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगाची स्थापना करण्यात आली होती. या आयोगाने आपला चौकशी अहवाल न्यायालयात सादर केलाय.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram