Eknath Shinde vs Uddhav Thackeray : शिवसेना कुणाची? आज होणार सुप्रीम कोर्टात सुनावणी

Continues below advertisement

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की बंडखोरी करत फडणवीसांबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटाची? कायद्याच्या दृष्टीनं शिवसेनेचे सरसेनापती कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवसेना आमदार, खासदारांनी कुणाचे आदेश मानायचे? ठाकरेंनी नियुक्त केलेल्या प्रतोदांचे की शिंदे गटाच्या प्रतोदांचे? महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर जन्माला घातलेले हे प्रश्न.. आणि देशात कधी नव्हे तो निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय पेचावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुुरू होणार आहे. दोन्ही गटांनी दाखल केलेल्या वेगवेगळ्या याचिकांवर आज सरन्यायाधीश एन व्ही रमण्णा, न्यायमूर्ती कृष्ण मुरारी आणि न्यायमूर्ती हिमा कोहली यांच्या त्रिसदस्यीय खंडपीठापुढे सुनावणी सुुरु होणार आहे.. या सुनावणीकडे फक्त महाराष्ट्राचंच नव्हे तर अवघ्या देशाचं लक्ष असणार आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram