आता मुलींनाही NDA ची प्रवेश परीक्षा देता येणार, सर्वोच्च न्यायालयाचा देशभरातल्या मुलींना दिलासा
Continues below advertisement
आता देशाच्या सुरक्षेसाठी सैन्यदलात भरती होऊ इच्छिणाऱ्या मुलींसाठी मोठी बातमी... एनडीए म्हणजे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीची दारं आता मुलींसाठीही खुली होणार.. एनडीएची प्रवेश परीक्षा मुलींनाही देता येणार आहे. सर्वोच्च न्यायालयानं देशभरातील मुलींना मोठा दिलासा दिलाय. ५ सप्टेंबरला एनडीएची प्रवेश परीक्षा आहे आणि पहिल्यांदाच मुलींनाही ही परीक्षा देता येणार आहे.
Continues below advertisement