Sunblast : सुर्याच्या पृष्ठभागावर चार वर्षातला सर्वात मोठा स्फोट,सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता

आता बातमी येतेय अंतराळातून... सौरमालेतील मुख्य ऊर्जा स्त्रोत असलेल्या सूर्याच्या पृष्ठभागावर मोठा स्फोट झालाय. सूर्याच्या पृष्ठभागावर सौर ज्वाळा म्हणजे सोलर फ्लेयरमुळे स्फोट होतात. मात्र, गेल्या चार वर्षांतील सूर्याच्या पृष्ठभागावर झालेला हा सर्वात मोठा स्फोट झाल्याचे म्हटले जात आहे. स्पेस वेदर प्रेडिक्शन सेंटरने दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट 'AR 2838' नावाच्या सनस्पॉटवर झाला आहे. येत्या काही आठवड्यांत हा सनस्पॉट जागा बदलण्याचीही शक्यता आहे. हा सनस्पॉट काही काळ त्याच जागी राहिला तर तो पृथ्वीवरूनही दिसू शकतो. महत्त्वाचं म्हणजे, या सौर ज्वाळा पृथ्वीच्या दिशेने आल्यास याचा पृथ्वीवरील चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होऊ शकतो. रेडिओ कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रिकल पॉवर ग्रिड्स तसेच जीपीएसवर परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे अंतराळयान आणि अंतराळवीरांनाही धोका निर्माण होऊ शकतो. अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केलीय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola