
Sunandan Lele On Rahul Dravid : अखेर राहुल द्रविडच्या नशिबी ट्वेन्टी20 विश्वचषक
Sunandan Lele On Rahul Dravid : अखेर राहुल द्रविडच्या नशिबी ट्वेन्टी20 विश्वचषक रोहित शर्मा आणि त्याच्या शिलेदारांनी भारतीय संघाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांना त्यांच्या आयुष्यातली सर्वात अनमोल भेट दिली. ती भेट होती ट्वेन्टी२० विश्वचषकाची. राहुल द्रविड यांनी त्यांच्या १६ वर्षांच्या कारकीर्दीत भारताच्या सर्वोत्तम फलंदाजांपैकी एक अशी ओळख निर्माण केली होती. पण १६ वर्षांच्या कारकीर्दीत त्यांना वन डे किंवा ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं सुख कधीच लाभलं नव्हतं. अखेर भारतीय संघाचे प्रशिक्षक या नात्यानं राहुल द्रविड यांना ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषक विजयाचं समाधान मिळालं. पाहूयात क्रिकेट समीक्षक सुनंदन लेले यांचा खास रिपोर्ट. रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मानं उपकॅप्टन हार्दिक पांड्याला त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक म्हणून किस केलं. हार्दिकनं क्लासेन आणि मिलरची विकेट घेतली. रोहित शर्मानं पत्नी रितिका सचदेव हिला विजयानंर मिठी मारत विजय साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, भारताला विजेतेपद मिळालं नव्हतं. अखेर रोहितच्या टीम इंडियानं अपयश पुसून टाकलं आहे. भारतानं 7 धावांनी मॅच जिंकली. विराट कोहलीवर रोहित शर्मानं विश्वास टाकला होता. अखेरच्या मॅचमध्ये रोहित , रिषभ अन् सूर्यकुमार लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं केलेल्या 76 धावा गेमचेंजर ठरल्या. रोहितनं विराटला मिठी मारली.रोहित शर्मानं बारबाडोसच्या स्टेडियमवर नतमस्तक होत तिथूनच भारतमातेला वंदन केलं.