British Prime Minister Rishi Sunak : सुनक ब्रिटनचे पंतप्रधान, आठवला आशिष नेहरा!
भारतीय वंशाचे ऋषी सुनक ब्रिटनचे पंतप्रधान बनलेत... ब्रिटनचं पंतप्रधानपद मिळवणारे ऋषी सुनक पहिले भारतीयं वंशाचे व्यक्ती ठरलेत... सुनक पंतप्रधान बनताच नेटकऱ्यांना भारताचा माजी क्रिकेटपटू आशिष नेहराची आठवण झालीय.. ट्विटरवर नेटकऱ्यांच्या कल्पनाशक्तीला बहर आल्याचं पाहायला मिळतंय... अनेकांना सुनक आणि नेहरा यांच्या चेहऱ्यात साम्य आढळलंय.. सुनक आणि नेहरा हे सख्ख्या भावांसारखे दिसत असल्याचं काहींनी म्हटलंय.. तर काहींनी यामागे फिल्मी कनेक्शन जोडण्याचाही प्रयत्न केलाय.. सोशल मीडियावर या संदर्भातील मीम्सचा वर्षाव सुरु आहे.,...
Tags :
Twitter Ashish Nehra Rishi Sunak Former Cricketer British Prime Minister Indian Origin SOCIAL MEDIA Reminiscence Imagination Sunak And Nehra