Subodh Kumar Jaiswal सीबीआयचे नवे प्रमुख, राज्य सरकारची डोकेदुखी वाढणार?
सेंट्रल ब्युरो ऑफ इन्वेस्टिगेशन अर्थात सीबीआयच्या संचालकपदी राज्याचे माजी पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची नियुक्ती झाली आहे. सुबोध कुमार जयस्वाल हे 1985 च्या बॅचचे भारतीय पोलिस सेवा (आयपीएस) अधिकारी आहेत. सध्या ते केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) महासंचालक म्हणून जबाबदारी पार पाडत आहेत.