SBI | एटीएममधून पैसे काढताय? ओटीपी टाकावा लागणार; एसबीआयची नवी सेवा | ABP Majha
Continues below advertisement
स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच, SBI आपल्या नियमांमध्ये काही बदल करणार आहे. एटीएममधून पैसे काढण्यासाठी असणाऱ्या नियमांमध्ये SBI बदल करणार असून येत्या नव्या वर्षापासून हे नियम लागू होणार आहेत. नव्या नियमांतर्गत रात्री 8 पासून ते सकाळी 8 वाजेपर्यंत एटीएम ट्रांजेक्शन्ससाठी ग्राहकांना ओटीपी देणं आवश्यक असणार आहे. जर ओटीपी नसेल तर ग्राहक 10 हजारांपेक्षा जास्त रक्कम एटीएममधून काढू शकणार नाही.
Continues below advertisement