श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रीय महामार्गसंबंधित अडचणी मांडल्या, काम पूर्ण करण्याचं गडकरींचं आश्वासन

Continues below advertisement

लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान खासदार श्रीनिवास पाटील यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रीय महामार्ग संदर्भातील विषय मांडले. यामध्ये पारगाव येथील अपघाताच्या घटना लक्षात घेता तेथे नवीन पुलाचे काम हाती घ्यावे अशी मागणी केली. यासोबतच सर्व अंडरब्रिज व ओव्हरब्रीजच्या ठिकाणी अपघात टाळण्यासाठी प्रकाश व्यवस्था करावी हा मुद्दाही मांडला. कराड येथील कोल्हापूर नाक्यावर तीन पदरी पुल आहे. तेथे अपघातांच्या घटना वाढत आहेत. याठिकाणी सहा पदरी पुल बांधण्यात यावा असे सुचविले. पुणे ते शेंद्रेपर्यंतच्या महामार्गाची अवस्था बिकट झाली आहे. हा रस्ता दुरुस्ती करण्याकडे सरकारने लक्ष द्यावे अशी अपेक्षा व्यक्त करतानाच खंबाटकी येथील बोगद्यांचे काम लवकर पुर्ण व्हावे अशी मागणीही यावेळी केली. याला उत्तर देताना केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरीजी यांनी पुणे-सातारा महामार्गावरील बहुतेक अडचणी सोडवल्या गेल्या असून उर्वरीत काम देखील लवकर पूर्ण होईल असे सांगितले. कराड येथील पुलाच्या परिसरात अपघाताचे क्षेत्र असेल तर तातडीने अर्ज द्या असे सुचवले. अपघातातील जिवितहानी टाळण्यासाठी अशी अपघातप्रवण क्षेत्रे काढून टाकण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन गडकरी यांनी दिले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram