Sri Lanka : श्रीलंका सरकारकडे पगार द्यायला पैसे नाहीत, आता छापणार नोटा

Continues below advertisement

कंगाल झालेल्या श्रीलंकेत सरकारकडे आता कर्मचाऱ्यांचा पगार द्यायला पैसे नाहीत. त्यामुळे नोटा छापण्याचा निर्णय सरकारनं घेतलाय. दिवाळखोरीत गेलेल्या श्रीलंकेत सध्या आर्थिक आमि राजकीय अस्थिरता आहे. अर्थव्यवस्था पुन्हा रुळावर आणण्यासाठी नवे पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे प्रयत्न करतायत. एकीकडे नव्या नोटा छापण्याबरोबरच सरकारी विमान कंपनी विकण्याचा निर्णयही सरकारनं घेतलाय. पंतप्रधान विक्रमसिंघे यांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात सरकार करत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. पुढचे दोन-तीन महिने आव्हानात्मक असतील असंही त्यांनी जनतेला सांगितलंय. भावी पिढीच्या भविष्यासाठी आपण कठोर निर्णय घेत असल्याचं त्यांनी म्हटलंय.

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram