Madhubani Painting | मधुबनी चित्रकारांचं मूळ स्थान जितवारपूर, बिहार निवडणुकीचं 'चित्र' मांडणारा रिपोर्ट

Continues below advertisement
जितवारपूर... जगभर प्रसिद्ध असलेल्या मधुबनी पेंटिगचं हे मूळ स्थान आहे. चित्रं काढायची, प्रदर्शनात मांडायची आणि पैसे कमवायचे हा वर्षानुवर्षाचा नित्यक्रम पण लॉकडाऊनमुळे त्याला ब्रेक लागला. बिहारमधील जितवारपूर आणि परिसरात पाच हजार मधुबनी चित्रकार आहेत. या गावात 3 पद्मश्री, 25 राष्ट्रीय पुरस्कार विजेते आणि शेकड्यांनी राज्य पुरस्कार विजेते राहतात. सगळ्यांचं पोट कलेवरच अवलंबून आहे. जितवारपूरनं मधुबनी पेंटिग्ज जगभरात पोहोचवली. देशाचं नाव मोठं केलं. त्यामुळे सरकारने गाव शिल्पग्राम म्हणून घोषित केलं. पण काम पुढे सरकलं नाही आणि निधी गायब. त्यामुळे गावाने मतदानावर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram