Sonia Gandhi : सोनिया गांधी लवकरच जी-२३ गटाशी संवाद साधण्याची शक्यता
Sonia Gandhi : पाच राज्यांच्या निकालानंतर काँग्रेसमधला अंतर्गत विरोधाचा आवाज आता वाढत चाललाय. काल जी 23 गटाच्या नेत्यांची एक बैठक गुलाम नबी आझाद यांच्या दिल्लीतल्या निवास्थानी पार पडली..त्यात अप्रत्यक्षपणे प्रियंका गांधींच्या महासचिवपदाच्या राजीनाम्याचीही मागणी या गटानं केल्याचं दिसतंय. पण ही मागणी मान्य होणार का? आणि मुळात या नेत्यांचं राजकीय वजन, त्यांच्या राजकीय भविष्यावर याचा काय परिणाम होणार याचीही चर्चा आहे. सोनिया गांधी लवकरच जी-२३ गटाशी संवाद साधण्याची शक्यता आहे.. हरियाणाच्या भूपेंद्र हुड्डांनी कालच राहुल गांधींची भेट घेतलीये.