Solapur on Vijay Wadettiwar : वाचाळवीर राजकीय नेत्यांबद्दल सोलापूरकरांना काय वाटतं?

Solapur on Vijay Wadettiwar : वाचाळवीर राजकीय नेत्यांबद्दल सोलापूरकरांना काय वाटतं? 
जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये पर्यटकावर झालेल्या भ्याड हल्याला आज एक आठवडा पूर्ण होतोय. ह्या हल्यात 27 भारतीय निष्पाप लोकांचा मृत्यू झाला. आठवडा पूर्ण झाला तरी या भारतीयांच्या काळजावरील या जखमा अजून ही ओल्यात आहेत. मात्र या हल्यानंतर राजकीय नेते ज्या पद्धतीने विधान सुरू आहेत ते पाहता या जखमावर मीठ चोळण्यासारखं काम सुरूय. कोणी धर्म पाहायला आंतकवाद्याकडे वेळ होता का म्हणतंय तर कोणी आर्थिक बहिष्काराची भाषा करतायत.. हे सर्व विधान पाहता राजकीय नेत्यांना गांभीर्य राहिलंय का असाच प्रश्न पडतोय.. सोलापूरकरांना या वाचाळवीर राजकीय नेत्यांबद्दल काय वाटतं? पाहुयात..  

आजच्या महत्वाच्या बातम्या : 29 April 2025

पहलगाम हल्ल्यातील पीडितांबाबत बेताल वक्तव्य करणाऱ्यांना सणसणीत चपराक...राजकारण्यांनी माणुसकी दाखवावी, हल्ल्यातून बचावलेल्या जगदाळे कुटुंबाचं आवाहन 

आमच्या हातात बंदूक द्या, दहशतवाद्यांना गोळ्या घालू, संतप्त लेले, मोने, जोशी कुटुंबाच्या मित्रपरिवाराच्या तीव्र भावना... पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्याची मागणी 
पहलगाम हल्ल्यातील महाराष्ट्रातील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५० लाख रुपये, आणि एकाला सरकारी नोकरी, मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्र्यांची घोषणा 
पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी हाशिम मुसाचं पाकिस्तानी सैन्याशी कनेक्शन... मुसा उर्फ आसिफ फौजी पाकिस्तानच्या स्पेशल सिक्युरिटी फोर्समध्ये कमांडो असल्याचं उघड... 
काश्मीरच्या वेगवेगळ्या भागात दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराची धडक करवाई...एएनआयच्या सूत्रांची माहिती, जागोजागी सर्च ऑपरेशन, दहशतवाद्यांची लांडगेतोड सुरू...

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola