Snowfall in north India : उत्तरेकडील राज्यात थंडीची जोरदार लाट, हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी
Continues below advertisement
उत्तरेकडील राज्यात थंडीची जोरदार लाट आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून या राज्यांमध्ये जोरदार बर्फवृष्टीही होतेय. हिमाचल प्रदेशात होत असलेल्या बर्फवृष्टीमुळे शिमला, धर्मशाला, विकासनगर यासारख्या भागात बर्फाची पाढरी शाल पांघरल्याचं चित्र आहे. शिमल्यात तर सलग तिसऱ्या दिवशी बर्फवृष्टी होतेय. या भागात आलेले पर्यटकही या बर्फवृष्टीचा आनंद लुटताना दिसत आहेत. हिमाचल प्रदेशच्या १२ पैकी ९ जिल्ह्यात ६ इंचांपेक्षा अधिक हिमवृष्टी झालेली आहे. शिमला, कुलू, मनाली, लाहुल-स्पिती, किन्नौर, सिरमौर, कांगडा, चंबा या भागात अजूनही बर्फवृष्टी सुरू आहे.
Continues below advertisement