Caste : घटस्फोटानंतर आईनं संगोपन केल्यास मुलांना आईची जात लावण्याचा अधिकार : उच्च न्यायालय
घटस्फोट झाल्यानंतर आईनं मुलांचं संगोपन केलं असेल तर त्या मुलांना आईची जात लावण्याचा अधिकार आहे, असा मोठा निर्णय मुंबई उच्च न्यायालयानं दिला आहे..या प्रकरणात उच्च न्यायालयानं जात पडताळणी समितीचा निर्णय रद्द करत ठाण्यातील तरुणीला मोठा दिलासा दिलाय. ही तरुणी सात वर्षांची असल्यापासून, वडिलांशी घटस्फोट घेतलेल्या आईसोबत राहते. आईची जात अनुसुचीत जातीत मोडत असल्यानं, तरुणीनं जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी सांगली जिल्हा जात पडताळणी समितीकडे अर्ज केला. मात्र समितीनं वडिलांच्या जातीचे पुरावे मागितले. पण उच्च न्यायालयानं आईची जात लावण्याचा अधिकार दिल्यानं तरुणीला मोठा दिलासा मिळाला आहे.