Sikkim Floods : सिक्कीममध्ये ढगफुटी, पूर आल्यानं 23 जवान बेपत्ता; आठ नागरिकांचा मृत्यू
सिक्कीममध्ये अचानक पूर आल्यानं लष्कराचे २३ जवान बेपत्ता आहेत, तर आठ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. लष्कराच्या ४१ गाड्या चिखलाखाली दबल्या गेल्या आहेत. लाचेन खोऱ्यात बुधवारी पहाटे ढगफुटी झाली, त्यानं काही मिनिटांत पूर आला, आणि तीस्ता नदीची पातळी १५ ते २० फुटानं वाढली. मृतांपैकी तिघांचे मृतदेह तर उत्तर बंगालपर्यंत वाहून गेले. लष्कराकडून बेपत्ता जवानांचा शोध सुरू आहे. मात्र पुरामुळे संपर्क करणं कठीण झालं होतं, ज्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते.