Sikkim Flood : सिक्कीममधील भीषण पुरात 7 जवानांसह 26 जणांचा मृत्यू,ढगफुटीमुळे तीस्ता नदीला पूर
सिक्कीममधील भीषण पुरात आतापर्यंत सात जवानांसह 26 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे. तर 142 जण बेपत्ता असून आतापर्यंत 2 हजार 413 नागरिकांना वाचवलं असून त्यांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. ढगफुटीमुळे तीस्ता नदीला अचानक पूर आला होता. यात आतापर्यंत 26 जणांचा बळी गेला आहे. पुरातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत देण्याची घोषणा सिक्कीमच्या मुख्यमंंत्र्यांनी केली आहे.