Indian Air Force : भारतीय हवाई दलाकडून सामर्थ्याचं प्रदर्शन, 91 वर्धापन दिन : ABP Majha

बातमी आहे भारतीय हवाई दलाच्या सामर्थ्याची. येत्या ८ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचा ९१व्या वर्धापन दिन आहे. या वर्धापन दिनानिमित्त आयएएफने एक व्हिडीओ जारी केला आहे. केंद्रीय कमांडची लढाऊ विमानं, हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या आयएएफ एरोबॅटिक्स टीमचे विलक्षण कौशल्य या व्हिडीओत प्रदर्क्षित करण्यात आला. भारतीय वायुसेना दिनाचा अंतिम सोहळा ८ ऑक्टोबरला प्रयागराज येथे होणार आहे. आयएएफद्वारे राष्ट्राच्या विकासात योगदान करणाऱ्या आत्मनिर्भर भारत, नारी शक्ती, अग्निवीर वायूसेना आणि देशाच्या हवाई दलाला सशक्त करणाऱ्या सेवा या व्हिडीओमधून दाखवण्यात आल्या आहेत 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola