Ram Mandir | कारसेवकांची जी इच्छा, त्याप्रमाणे भव्य मंदीर साकारलं जात नाहीये : शिवसैनिक संतोष दुबे
बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात बाळासाहेब ठाकरे यांच्यासह ज्या शिवसैनिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्यापैकी एक म्हणजे संतोष दुबे. बाबरी प्रकरण ज्यावेळी घडलं त्यावेळी संतोष अवघ्या 22 - 23 वर्षांचा शिवसैनिक. गेली अनेक वर्ष देशाच्या राजकारणात गाजलेल्या मु्द्दा निकालात निघाला असून अयोध्येत अखेर राम मंदीर बांधण्यात येणार आहे. 5 ऑगस्टला राम मंदीराच्या भूमिपूजनाचा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. अशातच राम मंदिर बनत असताना या शिवसैनिकांच्या मनातल्या भावना काय आहेत? याप्रकरणाशी निगडीत अनेक प्रश्नांची उत्तरं संतोष दुबे यांच्याकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.