Shiv Sena Poster: शिवसेनेची पोस्टरबाजी, मनसेला टोला ABP Majha

महाराष्ट्रातल्या दोन्ही ठाकरे बंधूंमध्ये हिंदुत्व सिद्ध करण्याची स्पर्धा सुरु झालीय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही..  सध्या आक्रमक हिंदुत्वाचा भोंगा वाजवणारे मनसे प्रमुख राज ठाकरे ५ जून रोजी अयोध्या गाठत प्रभू श्रीरामाचं दर्शन घेणार आहेत. तर त्यांचे पुतणे, म्हणजेच राज्याचे पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे १० जूनला अयोध्या दौऱ्यावर असतील अशी माहिती शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिलीय. राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावरुन शिवसेना आणि मनसेत पोस्टर वॉर सुरु झालंय.  असली आ रहा है, नकली से सावधान असे पोस्टर्स सध्या अयोध्येत झळकताहेत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola