'राममंदिरासाठी एक कोटी ट्रान्सफर केले', उद्धव ठाकरेंनी ट्रस्टला लिहिलेलं पत्र 'माझा'च्या हाती
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर ट्रस्टच्या अध्यक्षांना लिहिलेलं पत्र एबीपी माझाच्या हाती लागलं आहे. 27 जुलै रोजी राम मंदिरासाठी एक कोटी रुपयांची देणगी दिल्याचं पत्रात नमूद केलं आहे. राम मंदिरासाठी बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेचं मोठं योगदान असल्याचं पत्रात लिहिलं आहे. तसंच माझीही प्रभू रामावर श्रद्धा असल्याचं मुख्यमंत्र्यांनी पत्रात म्हटलं आहे. याशिवाय आरटीजीएस क्रमांक आणि बॅंकेची माहिती या पत्रात लिहिली आहे.