Share Market: शेअर बाजारात पडझड, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी शेअर बाजार कोसळला ABP Majha
शेअर मार्केटसाठी आजचा दिवस आहे ब्लॅक मंडे ठरला आहे. आजच्या दिवशी शेअर बाजारात शेअर्सची झपाट्याने विक्री झाल्याचं दिसून आलं. आज शेअर मार्केट बंद होताना सेन्सेक्स 1600 अंकांनी घसरला आहे तर निफ्टीही 468 अंकानी घसरला आहे. सेन्सेक्समध्ये 2.62 टक्क्यांची घसरण होऊन तो 57,491.51 वर पोहोचला आहे तर निफ्टीमध्ये 2.66 टक्क्यांची घसरण होऊन तो 17,149.10 वर पोहोचला आहे.