Sharad Pawar PC | शेतकरी हिंसक झाल्यास जबाबदारी भाजप सरकारची : शरद पवार
नवी दिल्ली : "आतापर्यंत शांत असलेले शेतकरी जर हिंसक झाले तर सर्व जबाबदारी भाजप सरकारची असेल," अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत मागील दोन महिन्यांपेक्षा जास्त काळापासून सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषदेत शेतकरी आंदोलन, इंधनदरवाढीच्या मुद्द्यावरुन मोदी सरकारवर टीका केली.
सर्वसामान्य जनतेला इंधन दरवाढीचा फटका पडला आहे. पण या समस्या कशा वाढतील यावर मोदी सरकारचे लक्ष आहे. आज भारत सरकार यावर लक्ष देत नाही. पेट्रोलियम पदार्थांवर जास्त उत्पन्न घेत आहे. पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे देशातील जनता नाराज आहे, असं शरद पवार म्हणाले.