Sharad Pawar on PM Modi : विरोधक एकत्र आल्यास 2024 मध्ये वेगळं चित्र : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पक्षाच्या अल्पसंख्याक विभागाच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात बोलताना बिल्कीस बानो प्रकरणी दोषींची सुटका करण्याच्या निर्णयावरून पवार यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरच निशाणा साधला. पंतप्रधानांनी स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात नारी सन्मानचा नारा दिला आणि दोन दिवसांत गुजरात सरकारनं बिल्कीस बानो प्रकरणातील दोषींना सोडलं असं टीकास्त्र पवार यांनी सोडलं. विरोधक एकत्र आले तर २०२४ मध्ये देशांत वेगळं चित्र दिसू शकेल असं पवार यांनी म्हटलंय. अनिल देशमुख, नवाब मलिक आणि संजय राऊत यांच्यावरील कारवाईवरूनही त्यांनी भाजपवर निशाणा साधला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola