Iran US Dispute | इराण-अमेरिकेतला तणाव वाढला, भारतावर काय परिणाम होणार? | ABP Majha
अमेरिका आणि इराणमधील तणाव आणखी वाढला आहे. आता इराणने अमेरिकेच्या इराकमधील लष्करी हवाईतळावर हल्ला केला आहे. अमेरिकी सैन्यावर जवळपास डझनहून अधिक मिसाईल यावेळी डागण्यात आले आहेत. इराणने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली असून अमेरिकेकडून या वृत्ताला दुजोरा देण्यात आला आहे. अबरिल, अल असद आणि ताजी सैन्य या तळांवर हल्ला इराणने चढवला आहे. इराणच्या हल्ल्यानंतर अमेरिका आणि अमेरिकेच्या सैनिकांनी प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे.