Adar Poonawalla | पुढील काही आठवड्यात COVISHIELD लस बाजारात येईल : अदर पूनावाला

Continues below advertisement

नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच अतिशय सकारात्मकतेनं कोरोनाशी सुरु असणारा लढा जिकंण्याची जिद्द प्रत्येकानंच उराशी बाळगलेली असतानाच भारतीयांसाठी एक खास भेट केंद्रानं दिली. ही भेट म्हणजे कोरोना व्हायरसच्या लसींच्या आपातकालीन वापराला दिलेली मान्यता. ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजेच DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी रविवारी एक पत्रकार परिषद घेत सीरमच्या covishield आणि भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. ज्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणांना धीर मिळाला आणि देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ अदर पूनावाला यांनीही या अतिशय महत्त्वाच्या घोषणेनंतर एक सूचक ट्विट केलं. सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देत त्यांनी येत्या आठवड्यांमध्ये कोविशिल्ड येत्या आठवड्यांमध्ये बाजारात उपलब्ध होईल, असं ते म्हणाले. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, आरोग्य मंत्री हर्षवर्धन आणि लसीच्या निर्मितीमध्ये योगदान देण्याऱ्या सर्वांचेच आभारही मानले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram