Anil Desai on Bihar Election | शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार : शिवसेना खासदार अनिल देसाई
आगामी बिहार विधानसभा निवडणुकीत गुप्तेश्वर पांडे आणि शिवसेनेत सामना रंगणार आहे. सुशांत सिंह राजपूत प्रकरणात झालेल्या बदनामीनंतर शिवसेना वचपा घेण्यासाठी सज्ज झाली असून बिहार निवडणुकीत शिवसेना 50 उमेदवार रिंगणात उतरवणार आहे. 2015 मध्ये शिवसेनेने 80 जागा लढवत 2 लाखांपेक्षा जास्त मत घेतली होती. यंदा शिवसेना 50 जागा लढवून इतर पक्षांना टक्कर देण्यासाठी सज्ज झाली आहे. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांवर बिहारचे माजी पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी संशय व्यक्त केला होता, त्यांना टक्कर द्यायला शिवसेनेचा मावळा सज्ज झाला आहे, असं मत शिवसेना खासदार अनिल देसाई यांनी वक्त केलं. एबीपी माझाला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीत ते बोलत होते