SBI Guidelines For Pregnant Women : एसबीआयचा गरोदर महिलांबाबतचा वादग्रस्त नियम मागे ABP Majha

भारतीय स्टेट बँकने तीन महिन्यापेक्षा जास्त प्रेग्नेंट असलेल्या महिलांना अनफिट असल्याचं सांगत भरती प्रक्रियेतील नियमांत बदल केला होता. एसबीआयच्या या निर्णायावरुन देशभरात संताप व्यक्त झाला. देशभरातून टीकास्त्र सोडलं गेलं... दिल्ली महिला आयोगाकडून यासंदर्भात एसबीआय व्यवस्थापनाला नोटीस जारी करत उत्तर मागितलं होतं. या वाढत्या दबावानंतर एसबीआयने आपला वादग्रस्त निर्णय मागे घेतला आहे. एसबीआयने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.  लोकांच्या भावनांचा विचार पाहता प्रेग्नेंट महिलांसंदर्भातील बदललेला नियम माघारी घेतला आहे असं एसबीआयनं म्हटलंय..यापुढे होणारी भरती जुन्या नियमांच्या आधारावरच होणार आहे.  

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola