Sanjay Raut : ED च्या धाडी चिंतेचा नाही, गंमतीचा विषय, विरोधी पक्षांकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर

Continues below advertisement

Sanjay Raut : महाराष्ट्रातील विरोधी पक्ष केंद्रीय यंत्रणांचा वापर करुन अराजकता पसरवत असल्याचा आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ईडीच्या धाडी हा चिंतेचा विषय राहिलेला नाही तर आता गंमतीचा विषय झाला आहे. वकिल सतिश उके हे लढले म्हणून त्यांच्यावर कारवाई केली आहे. आम्ही अनेकांविरोधात पुरावे दिले त्यावर कारवाई केली गेली नाही. न्यायाचा तराजू सरळ पाहीजे तो नसल्याचे संजय राऊत यावेळी म्हणाले. भाजप आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात याचिका दाखल करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे वकिल सतीश उके यांच्या घरी ईडीने छापा टाकला आहे. यासंदर्भात राऊत यांना प्रश्न विचारला असता त्यांनी प्रतिक्रिया दिली.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram