Goa Elections : गोव्यात काँग्रेस मोठा पक्ष असेल, प्रमोद सावंत निवडून येणं अवघड, संजय राऊतांच भाकीत

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस हे गोवा राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत. राज्य छोटे आहे, जबाबदारी मोठी आहे. म्हणून माझ्या त्यांना शुभेच्छा असल्याचे वक्तव्य शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. जमीनीवरचं वातावरण देवेंद्र फडणवीस आणि भाजपसाठी चांगलं नाही. स्वत: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचं निवडून येणं अवघड असल्याचे भाकीत संजय राऊत यांनी केले आहे. भाजपला गोव्यात बहुमत मिळणार नाही. काँग्रेस हाच गोव्यात सर्वात मोठा पक्ष असेल. बघूयात या घोडेबाजारात सत्ता कोण मिळवते असे राऊत म्हणाले.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola