
Sanjay Raut Meet Rakesh Tikait : संजय राऊत यांनी घेतली शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट
Continues below advertisement
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शेतकरी नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली. उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगरमध्ये जाऊन राऊत यांनी टिकैत यांची भेट घेतली. शेतकरी आंदोलनादरम्यान आंदोलकांनी राजकीय पक्षांपासून अंतर ठेवलं होतं. पण टिकैत यांनी आज राऊत यांची उघड भेट घेतली. उत्तर प्रदेशात टिकैत यांच्या मदतीनं शिवसेना काही जागा लढवणार का? अशी चर्चा त्यामुळे सुरु झाली आहे.
Continues below advertisement