ABP News

Kargil Marathon : सरहद संघटनेची 'Kargil Marathon', मराठमोळ्या संजय नहार यांचा कारगीलमध्ये उपक्रम

Continues below advertisement

कारगीलला आपण सगळेच युद्धभूमी म्हणून ओळखतो, या लडाखच्या नैसर्गीक सौंदर्यात वसलेल्या शहरानं बर्फवृष्टीसोबतच कधी तोफगोळ्यांची बरसातही झेलली आहे.  हेच कारगील भारताशी मनानं जोडलं जावं, लेह-लडाखच्या परिसरातल्या तरुणांच्या अंगभूत क्षमतांना वाव मिळावा याकरता संजय नहार यांची सरहद संघटना गेली 24 वर्षे काम करत आहे. सरहद कारगील मॅरेथॉन हा सरहद संघटनेचा उपक्रम या भागात अतिशय लोकप्रिय आहे. सरहद संघटना कारगील शहर ते कारगील युद्धाच्या वीरभूमीपर्यंत मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करते. 

कलम 370 हटवल्यानंतरचा कर्फ्यु आणि कोविड स्थितीमुळे गेली 2 वर्षे सरहदच्या कारगील मॅरेथॉनला ब्रेक लागला होता. परंतु या वर्षी हा उपक्रम पार पडणार असून यंदा आयपीएस अधीकारी कृष्ण प्रकाश हे या मॅरेथॉन स्पर्धेचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसिडर आहेत. आता दोन वर्षाच्या ब्रेकनंतर 31 ऑक्टोबरला 'कारगील मॅरेथॉन' होणार आहे. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram